राधा मुरलीला म्हणे चिडोनी, का छळते तू कणा-कणाला?
असते त्याच्या जवळी नेहमी तू , माझा देव न मला पावला ||
असते त्याच्या जवळी नेहमी तू , माझा देव न मला पावला ||
नेहमी असते जवळी तयाच्या , तरीही मन हे तुझे भरेना?
क्षणैक दिसता, मज हर्षवायू ,पण हा "काळा" कधी हसेना ||
क्षणैक दिसता, मज हर्षवायू ,पण हा "काळा" कधी हसेना ||
तुझा जसा तो , असे ही माझा , इतुके का हे तुला कळेना?
दुखी-कष्टी सदा मी राधा ,तरीही मन का तुझे द्रवे ना ?
दुखी-कष्टी सदा मी राधा ,तरीही मन का तुझे द्रवे ना ?
मुरली मग ती हसुनी बोले , राधे पूस हे डोळे ओले ..
"माझा ही" अन शाम "तुझा ही" , भलते का ते चित्ती आले?
"माझा ही" अन शाम "तुझा ही" , भलते का ते चित्ती आले?
जे पिंडी तेही ब्रम्हांडी , "कृष्ण-लीला" ही युगेही चाले ..
"तू मीच" अन "मी तूच" गं , "माझे-तुझे" ना काही उरले ||
"तू मीच" अन "मी तूच" गं , "माझे-तुझे" ना काही उरले ||
काम-क्रोध-मद-लोभ-मोह-मय, ना छिद्रे हीं , जणू षड्रिपू झाले ..
"कृष्ण श्वास" हा देहीं फिरता , जीवन अपुले संगीत झाले ||
"कृष्ण श्वास" हा देहीं फिरता , जीवन अपुले संगीत झाले ||
"मन राधा" अन "आत्मा मुरली" , कृष्ण नाम हे मनी धरावे ..
काय तुझे? अन काय ते माझे? .. कृष्णाचरणी सदा नमावे ..कृष्णाचरणी सदा नमावे..
काय तुझे? अन काय ते माझे? .. कृष्णाचरणी सदा नमावे ..कृष्णाचरणी सदा नमावे..
|| कॄष्णार्पणमस्तु ||
-- केदार १० मार्च २०१०

4 comments:
तोडलस मित्रा ! अप्रतिम ! मराठीत कशी काय बुवा स्फुर्ती झाली ?!!!
apratim !!! maze shabda apure aahet hyacha koutuk karayala .. apratim apratim apratim ... khupach mast ...
tatvadhnya zalat tumhi raje ... bhale shabbas ... !!
aamachya kavita dakhavanyachi laaj vatatey aata amhala .. evadhi apratim rachana ... khup anand dayak .. thank u very much 4 this !
कृष्णाचरणी सदा नमावे...
faarach surekh...
pan tuzi Raadha kuthey??
;)
apratim ahe kavita...aatma ani adhyatma yacha sundar milap houn sakarleli hi sundar kala kruti.. :)
Post a Comment