तुला
पाहिलं की खूप वेळा मला प्रश्न पडतात, मनात खूप विचार येतात …
कोणाचे
डोळे जास्त निरागस ?
त्या
कथेमधील हरणाचे ? का
प्रश्न विचारताना निरागसपणे पाहणाऱ्या तुझे ?
त्या डोळ्यांत जणू
सगळं जग सामावलेलं असतं ...खोल ... गूढ ... अर्थगर्भी ...
पण हे असूनही नितळ
निरागस असलेलं.... अगदी तुझ्या डोळ्यांसारखं !!
तुझं नाSSSजूक
चाफेकळी नाक ...
त्याचा लाजेने म्हणा
रागाने म्हणा ....गुलाबीसर झालेला तो शेंडा ...
पटकन प्रेमाने
त्याची पापी घ्यावी असा ...
आणि तू रागावतेस
....तेव्हा थरथरणाऱ्या त्या नाजूक नाकाच्या मी कित्ती प्रेमात पडलोय म्हणून सांगू
...!!
तुझे ते
धनुष्यासारखे आखीव रेखीव ओठ ...कायम माझ्या काळजाचा ठाव घेत आलेत ...
तू काही बोलली नाहीस
तरीही ...आणि बोलली तरीही ....
तुझ्या ओठांची
मनमोहक अदा ..किती किती घाव करतात मनावर ..
तुला नाही कल्पना
यायची त्याची ..!!
तुझ्या मऊ केसांचही
काहीसं तसंच आहे ...
उन्हाळ्याच्या
दिवसात रस्त्याने एकटं चालत जात असतांना,
अचानक झाडाच्या
सावलीचा थंडावा अलगद स्पर्शून जावा ...तशीच काहीशी जादू तुझ्या केसांची ....
दिवसभर थकून भागून
मी घरी यावा ... आणि तुझ्या मांडीवर डोकं ठेवून पडावं ...
आणि तश्यातच....
तुझ्या केसांचा मंद सुवास मनाला स्पर्शून , असंख्य चेतना जागवीत जावा ..
तो मंद सुवास ... मलमली
मऊ केसांचा स्पर्श एक वेगळीच शांतता देतो
!!
तुझी ती नाजूक मनगटं
....
कधी कधी तुला
छेडताना मलाच भीती वाटते ...पारीजातकाचं फुल जस वाऱ्याच्या स्पर्शानेच कोमेजून
जातं ...
तसं माझ्या धसमुसळेपणामुळे
तुला त्रास तर होणार नाही ना ??
तुझी बोटं केसातून
जेव्हा फिरवतेस ...
तेव्हा जगातली
सग्ग्गळी संकटं,चिंता,दु:ख ...अचानक नाहीशी झालीये असं वाटतं ...!!
तुझ्या बोटांची
जादूच तशी आहे ...कमळाच्या नाजूक देठासाराखी तुझी बोटं ...
तुझी ती
सदफुलीलासुद्धा हेवा वाटेल ...अशी नाजूक नाजूक गुलाबी नखं ...
सगळंच वेड लावणारं
...!!
तुझी गोरीपान मान ..आणि
त्यावर रुळणारं तुझं मंगळसूत्र ...
“तू माझी आहेस ...
हो “माझीच” आहेस ..” ..
ही भावनाच मनाला
किती सुखावून जाते म्हणून सांगू ...
पण कधी कधी मला त्या
मंगळसूत्रातल्या मण्यांचा रागसुद्धा येतो बरं का ..
माझ्यापेक्षा जास्त
वेळ तेच तुला बिलगून असतात ...!!
तुझी गोरीपान पावलं
...नितळ तळवे ...
जोडवी घातलेली तुझी
नाजूक नाजूक बोटं ...
मला खूप आवडलंय तुझं
हे नाजूक पावलांनी ...माझ्या आयुष्यात येणं ...!!
तुझ न ... तुझं
सगळंच खूप छान असतं ...
खूप सुरेख ...
खूप सुंदर ...
खूप निरागस ..
आणि तरीही खूप
अर्थगर्भी ..
तुझ लाजून हसणं ...
तुझं लाजून
बोलणं ...
लाडावणं ..
रागावण ..
पदराशी खेळणं ..
वेडावणं ...
चालणं ..
बोलणं ...
बघणं ,,
तुझं डोळे मिटून
गुणगुणणं ...
तुझं शांत झोपणं ...
तू झोपलेली असताना
तुझं हळू हळू श्वास घेणं ...
बघSSSत राहावंस
वाटतं सगळं ... !!
सग्गळच खूप आवडतं
मला ...सगळं ...सगळं ... !!
हो , अशीच आहेस तू
...माझ्या आठवणीतली ...
माझ्या आठवणींच्या
कप्प्यात मी असंच जपलंय तुला !!
मला
पडलेल्या या सुंदर स्वप्नाच्या शेवटी शेवटी सुद्धा तुझ्या पाणीदार डोळ्यात मला
कायम मीच दिसत आलोय !!.
एखाद्या
फुलाचा सुवास सगळ्यांसाठीच असतो पण सडा मात्र फक्त झाडाभोवती ...
तसंच
तुझ आयुष्य तु जगलीस सगळ्यांसाठी, पण अलगदपणे ते पाखरून मात्र माझ्याभोवती गेलीस ...
फूल
झाडापासून वेगळं झालं की त्याचा सुवास विरून जातो , पण त्याच कधीतरी असणं हे कोणीच
कधी विसरत नाही !!
अजूनही फोटोमधून पटकन बाहेर येऊन माझ्या गळ्यात पडशील , लाजशील याची वाट पाहतो मी ...
होय
..”तू ... माझी तू .... माझीच तू” ... !!
तुझाच
.................... !!
1 comment:
क्या बात है अन्ना........आज मूड कुछ ज्यादा ही रोमांचित दिखरा.........वाह.............मजा आगया. बहुत दिनों बाद लिखे पर एकदम बढ़िया लिखा है.................
तुझी ती नाजूक मनगटं ....
कधी कधी तुला छेडताना मलाच भीती वाटते ...पारीजातकाचं फुल जस वाऱ्याच्या स्पर्शानेच कोमेजून जातं ...
तसं माझ्या धसमुसळेपणामुळे तुला त्रास तर होणार नाही ना ??
हे वाचून तर अगदी निशब्द..........
Post a Comment