खूप मागे एकदा एक किस्सा वाचला होता ....
अमेरिकेत एक कंपनीने त्यांच्या जाहिरातीत महिलांच्या
अंतर्वस्त्रावर अमेरिकेच्या झेंड्याचे चित्र / रंगसंगती प्रिंट करून त्या मादक मॉडेल्स
चे फोटो टाकले !! अपेक्षेप्रमाणे लगेचच त्या कंपनीविरुद्ध कोर्टात केसेस वगैरे
दाखल झाल्या राष्ट्रीय चिन्हाचा , अस्मितेचा , झेंड्याचा अपमान वगैरे आशयाच्या !!
यावर कोर्टाने फार सुरेख टिप्पणी केली ..
“अमेरीकेची अस्मिता , मान , अभिमान इतका क्षुल्लक नाही की जो
अशा कारणांमुळे कमी होईल , आणि तो जर अश्या कारणांमुळे कमी होत असेल तर आपण त्याला
जवाबदार आहोत !! आपण आपल्या देशाला अश्या पातळीवर न्यायला कमी पडलोय की जिथे अश्या
गोष्टीनी राष्ट्रध्वजाची अस्मिता , मान कमी होणार नाही !!”
हम्म .... आता हे सगळं वाचून झाल्यावर खालील विडंबन वाचा . (
हे विडंबन नाही कारण अश्या मास्टरपिसेस च विडंबन होउच शकत नाही, पण मला या शब्दा
खेरीज इतर कोणता शब्द सध्या सुचला नाही ... त्यासाठी तुम्ही मला करंटा समजा हव तर
... )
त्यानंतर ही तुम्हाला फार वाईट वाटलं या विडंबनाबद्दल , तर
चूक माझी नाही तुमची आहे .... तुम्हाला कुसुमाग्रज कळले नाहीत असं समजा अन तोंड
समोर करून कामाला लागा . (वाचा : माझ्या नादी लागू नका !!)
ओळखलत का सर मला , गुत्त्यात आला कोणी ,
हातावरती खर्चटलेले , अंगावरती पाणी !!
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून ,
अर्धी बाटली उरली होती , गेली मोरीत वाहून !!
नको नको म्हणता सटवीने मोरीत ओतली ,
मोकळ्या हाती ठेवले नाही , सिक्स्टी मात्र वाचली !!
मटकी खाल्ली चिल्ली खाल्ली , होते नव्हते खाल्ले ,
नशा म्हणून ओठांवरती पाणी थोडे ठेवले !!
रीती बाटली संगे घेउन बार आता शोधतो आहे ,
जुनी देणी फेडतो आहे , उधार नवा शोधतो आहे !!
बाटलीकडे हात जाताच हसत हसत उठला ,
पेग नकोत शेट जरा एकटेपणा वाटला !!
मोडून पडला पेग ,पण संपला नाही चकणा ,
ओठांकडे अंगठा दाखवून , फक्त “पी” म्हणा ...
फक्त “पी” म्हणा !!
-
कुसुमाग्रज-ज केडी !!
No comments:
Post a Comment