Friday, 4 October 2013

मी !!

सूर्याच्या लक्ख प्रकाशातही हरवून गेलेला मी , आणि रात्रीच्या गर्भात स्वत:लाच गवसलेला मी !!
लाख माणसांच्या गर्दीत हरवून गेलेला मी , नी माणुसकीच्या बाजारात एकटा राहिलेला मी !!
आयुष्याचा आदी मी अन आयुष्याचा अंत ही मी , येतांना आलो एकटा , आता एकटा मार्गस्थ मी !!
द्वैत-अद्वैताच्या कोड्यात अडकून पडलेला मी , अन सरतेशेवटी निर्गुणात एक बिंदू बनून राहिलेला मी !!

No comments: