आयुष्य ना , एखाद्या दवबिंदू सारखं असलं पाहिजे . छोटसंच , पण असं की , Living Life to it's Fullest !!
तसं पाहिलं तर दवबिंदू असतो काय ? एक थेंब पाण्याचा ?
का फक्त एक क्षण? काळाच्या कुशीत गोठून गेलेला? जगणं आणि मरणं दैवाच्या आधीन केलेला ?
खरंच , जगता आलं पाहिजे एखाद्या दवबिंदू सारखं , एकदातरी.
पाणी असून वाहता न आल्याचं दु:ख नाही , किंवा मोत्यासारखं दिसलो याचा गर्व नाही.
तुम्ही कधी ऑबझर्व केलंय का एखाद्या दवबिंदूला ? त्यामध्ये सूर्याला स्वत:त पाहण्याची ताकद असते. पण तरीही तो एखाद्या निर्मल भावने इतकाच हळवा सुद्धा असतो.
त्यामुळे , जेवढं जगलो तेवढं असं जगावं कि जगात किमान एक जण तरी कोणी असं असावं , कि ज्याला आपल्या “असण्याने” आणि “नसण्याने” सुद्धा फरक पडतो.
असं जगता आलं ना ... की मग किती जगलो याला काही महत्व उरत नाही.
“जगलो” हेच खरं देणं , जगाचं .. जगाला परत दिलेलं ....
एखाद्या “दवबिंदू” सारखंच ...... !!
............................ केदार ०३/०८/२००७
No comments:
Post a Comment