Thursday, 9 May 2013

मी बोलावले … कितीदातरी !!

मध्ये पक्ष्याचे एक छोटेसे पिलू उन्हाने किंवा पाण्या अभावी मृत होऊन पडलेले आणि आई पक्ष्याची प्रचंड घालमेल …. या सगळ्यातून शब्दबद्ध झालेली एक वेदना !!

सायंकाळ …
कातरवेळ …
मी बोलावले …
कितीदातरी !!

घन व्याकुळ …
धरा निश्चळ …
मी बोलावले …
कितीदातरी !!

मन चंचळ …
मृत्तिकेचा परिमळ …
मी बोलावले ….
कितीदातरी !!

नैन निर्जळ ….
हाक निष्फळ ….
मी बोलावले ….
कितीदातरी !!

झाडे समूळ …
तहानली व्याकुळ …
मी बोलावले …
कितीदातरी !!

पिल्लू निश्चळ …
प्राणांतिक घालमेल ….
मी बोलावले …
कितीदातरी !!

अणु रेणुतून ….
कणा कणातून …
का न भेटशी ?
एकदातरी ? …… केदार १ मे २०१३ !!

1 comment:

Aniket A said...

Uttam Sir!!