Wednesday, 7 November 2012

"क्लिक"


उस डोंगा परी रस नाही डोंगा , कारे भुललासी वरलीया रंगा !!... संत चोखामेळा ,

नाही नाही .. मी काही अगदी संत वाणी वर विवेचन करणार नाहीये. पण या ओळी अवचित मनात आल्या ... म्हणजे "क्लिक " झाल्या. कारण होते तो हा एक शब्द ..."क्लिक". आजकाल हा क्लिक झाला नाही तो क्लिक झाला नाही हा शब्द लग्नाच्या बाजारात सर्रास पाने वापरल्या जातो. (लग्नाच्या बाजारात .. या विषयावर वाद घालायचा असल्यास तो नंतर निवांत घालूच). मी पण "उभा" होतो तेव्हा मला सुद्धा नकार आलेले मला आठवतायत . मध्यस्थांचा फोन यायचा कि सगळा पटलय पण मुलगा मुलीला क्लिक नाही झाला. या क्लिक चा अर्थ मला खूप नंतर .उमगला. अर्थात मी तोपर्यंत लग्नाळलो होतो .
असो .. तर मुळ  मुद्दा ... "क्लिक". आपल्या पिढीत आजकाल आपण सगळे न एका सुपरफ़िशिअल जगात जगतो अस मला वाटतं . आणि मग त्या एका सुपरफ़िशिअल जगाचं नामकरण आपण करतो "क्लिक" या शब्दात .
खूप विचार केल्या नंतर मला विविध उप-प्रकार कळले क्लिक होण्याबद्दलचे . हं आणि मी आधीच स्पष्ट करू इच्छितो कि इथे मुलगा किंवा मुलगी  हा वादच नाहीये ... वाद आहे हा की आपण किती भौतिकतावादी होत चाललो आहोत?

बरेच मित्र मैत्रिणी माझ्याच .वयाचे . माझ्याच सारखे "उभे" असतांना चर्चा व्हायच्या या क्लिक बद्दल ... त्या दरम्यान क्लिक झालेले हे काही क्लीकेबल मुद्दे ....

(होणारा) वर पक्ष:

मुलगी दिसायला सुंदर असावी :
आता सुंदर ची व्याख्या काय असते बुवा ?? कोणत्याही आई वडलांना आपले अपत्य हे सुंदरच वाटणार न ? अगदी मनापासून पटत नसले तर कोणी आपल्या मुला-मुलीला कुरूप तर म्हणणार नाही. या उपर आपला सोन्या कितपत मदनाचा पुतळा आहे हे पण पहाणे तितकेच गरजेचे आहे मग.

मुलगी स्वभावाने KOOL असावी :
दुसरा धोक्याचा इशारा .... KOOL म्हणजे नक्की काय रे भाऊ ? हे आपलं आधीच स्पष्ट हवं !! कारण कावठेमहांकाळ मध्ये पोरींनी अगदी स्कर्ट घातला तरी ती हिरवीण होते ... आणि मंबई मध्ये पोरी अगदी बर्मुडा पासून बॉक्सर पर्यंत आणि साडी पासून पंजाबी पर्यंत .दिसतात .. मग तुला KOOL म्हणजे स्कर्ट हवा का कपडे टंचाई असल्यासारखी विजार हवी आपणच ठरवायचं !!

मुलगी घरकाम करून नोकरी करणारी हवी :
तिसरा गैरसमज .... इथे मी अगदी मुलींचीच किंवा मुलांचीच बाजू घेणार नाही ... पण हा विषय इतका मोठा आहे की यावर मी आणखी एक लेख ठोकू शकतो. तूर्तास इतके म्हणेन की WORK - LIFE  balance  हा खूप महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. इथे प्रत्येकाचा दृष्टीकोन खूप जास्त स्पष्ट हवा . कारण शेवटी पैशासाठी माणसं तोडायची कि माणसांसाठी पैसा तोडायचा ? हा ज्याचा त्याच्या व्याख्येचा प्रश्न असतो !! पण तो वेळीच स्पष्ट केलेला बरा कधीही . म्हणण्याचा मुद्दा हा ... कि अरे बाबा मुलगी जर घरकाम करणारी असेल ... तर मग नोकरी कधी करेल ? आणि नोकरी करणारी च अगदी हवी तर मग द्या पैसा ... मोलकरणी भरपूर मिळतात. पण मग हे करताना संस्कार , आपलेपण याची वाट लागते .. याला मुलांनी आणि तितक्याच प्रमाणात मुलींनी तयार राहावे. एक उदाहरण च अगदी द्यायचे झाले तर ते असे :
आमच्या ओळखीत एक जोडपं आहे .. छान लोक आहेत .. दोघेही खूप मनमिळाऊ .वगैरे .. गोड मुलगा आहे दोघांना . पण दोघेही करियर ओरिएनटेड/ पाळणा घरात ठेवलन मुलाला. आता यातली मुलगी डोळ्यात पाणी आणून सांगत होती  " अहो मला आई म्हणतच नाही हो हा. पाळणा घरातल्या मावाशिंनाच आई म्हणतो ." या एका वाक्यात सगळं सार येतं
असो ... मुले किंवा पुरुषांची लिस्ट इथेच येऊन थांबते  आता वळू वधू पक्षा कडे :

(होणारा) वधू पक्ष :

मुलगा उच्च विद्या विभूषित हवा :
आपण किती दिवे लावलेत अभ्यासात हे आपल्या ध्यानात असू द्यावे ही अट लिहितांना. माझ्या स्वत:साठी स्थळं शोधात असताना मी काही केंद्रातल्या याद्या वाचायचो तेव्हा करमणूक व्हायची ...

मुलगी  गोरी चित्पावन बी.कॉम . सध्या अमुक अमुक ठिकाणी अकौंट मध्ये कामाला .

अपेक्षा : मुलगा उच्च विद्या विभूषित हवा , मासिक पगार ८०००० किंवा जास्त , एकुलता एक , दिसायला चांगला , पुणे किंवा भारताबाहेर वास्तव्यास .
आता मला एक सांगा .. जो मुलगा असा असेल तो एकतर  "बी.कॉम . सध्या अमुक अमुक ठिकाणी अकौंट मध्ये कामाला " असणार्या मुलीशी घंटा का लग्न करेल ?
आणि दुसरे म्हणजे ... आपलं गाव ते छान आणि दुसरं ते घाण हा न्याय कुठचा  ? आणि आणखी एक ... समजा या मुलाने करियर आणि पैश्यासाठी .. US हून एकदम परतूर ला नोकरी स्वीकारली तर मग आपली मुलगी त्याला घटस्फोट देणार का ?

मुलगा सुंदर हवा :
इथे वर पक्षासाठी दिलेला च मुद्दा परत येतो.

मुलाचे स्वताचे किमान २bhk घर / गाडी इत्यादी असावे :
इथे पहिला प्रश्न मुलीने स्वताच्या मनास  .विचारावा .. की  आपले ती.स्व. किती वर्षांपासून रक्त आटवत आहेत ? आणि त्यांनी मग किती घरे घेतलीत ?
होईल न ... हळू हळू ... घर गाडी सगळे होते ... पण धीर महत्वाचा !!

मुलाच्या घरी इतर कोणी नको , आणि मुलगा शक्यतो एकुलता एक असावा :
(
हा वादाचा मुद्दा होऊ शकतो , पण वादेच्छुक व्यक्तींनी स्वतास एकदा विचारावे कि आपण एकदाही अशी केस ऐकलेली नाहीये का ? आजकाल हे सर्रास होत चाललाय. वाईट आहे !!)
एकाच प्रश्नाच्या उत्तरात सगळं स्पष्ट होईल . तो असा . मुलीचा भाऊ लग्नास उभा असतांना इच्छुक वधूही हा प्रश्न विचारू शकते. आणि अरे माणसे नकोच आहेत न तुम्हाला ? मग निधड्या विचाराने राहा न लिव्ह-इन मध्ये. माणसं नकोयत न ? मग का विचार करत बसायचं कोण काय म्हणेल असा ? मारा सगळ्या जगाला फाट्यावर . जागा स्वच्छंदी . पण नाही ... शेवटी माणसेच लागतात . "वन रूम किचन " हा भारत जाधव भार्गवी चिरमुले चा सिनेमा पहा एकदा ... पटेल मग काय ते !!




सरते शेवटी ... गाण्याच्या ओळी काही आठवतायत ...

इस रंगरूप पे देखो, हरगीज नाज ना करना
जान भी मांगे यार तो दे देना, नाराज ना करना
रंग उड़ जाते है, धुप ढलते है
 आणि बघा न ... कि आपण जो शब्द वापरतोय ... क्लिक ... तो कसा आहे ... आपण फोटो काढतांना .म्हणतो .. क्लिक केलं ...!!

ते आपल्याला वाटत असतं .... ते असतंच असं नाही !! शेवटी क्लिक वाटो अथवा न वाटो .. फोटो यायचा तसाच येतो . तो चांगला का वाईट हे आपण ठरवतो !!

तसंच आहे .. क्षणिक भावनेच्या आणि भौतिक वादाच्या आहारी न जाता ..." आयुष्य सुंदर करणारा आणि करून घेणारा जोडीदार आम्हाला हवा " अशी एकाच अट मुला-मुलींनी ठेवली तर ९९% अडचणी तिथल्या तिथेच विरून जातील हे नक्की !!

3 comments:

dr.amol said...

VASTAVVADI.....CHHAN..

Shabd गौरव said...

khara aahe re baba.. ha bhavsagar kasa paar karava yach chintet asnarya sarv bandhu bhagini ani palak varg yanni vachayla havay he... gharacha mudda tar yekdam rapchick... ani kityekda asahi hota ki mulga 10/12 vi nantar baher rahilela asto ghar sodun ani mag job sathi vagaire. tyamule tasahi to "tyachya" gharapasun lambach asato, ha mudda konihi bolat nahi.. ani mulgi sagla kahi sodun aali aahe yache umale datun yetat !!

Shabd गौरव said...

lekhatil vadhu pakshachya apekshanpaiki 3rya apekshemadhil swatache ghar ya muddya madhe ti swa aivaji teerthrup ha shabd hava. vadil sodun itaranna sambodhatana ti.swa. vaparnyat yete.