मध्ये
पक्ष्याचे एक छोटेसे पिलू उन्हाने किंवा पाण्या अभावी मृत होऊन पडलेले आणि
आई पक्ष्याची प्रचंड घालमेल …. या सगळ्यातून शब्दबद्ध झालेली एक वेदना !!
सायंकाळ …
कातरवेळ …
मी बोलावले …
कितीदातरी !!
घन व्याकुळ …
धरा निश्चळ …
मी बोलावले …
कितीदातरी !!
मन चंचळ …
मृत्तिकेचा परिमळ …
मी बोलावले ….
कितीदातरी !!
नैन निर्जळ ….
हाक निष्फळ ….
मी बोलावले ….
कितीदातरी !!
झाडे समूळ …
तहानली व्याकुळ …
मी बोलावले …
कितीदातरी !!
पिल्लू निश्चळ …
प्राणांतिक घालमेल ….
मी बोलावले …
कितीदातरी !!
अणु रेणुतून ….
कणा कणातून …
का न भेटशी ?
एकदातरी ? …… केदार १ मे २०१३ !!
1 comment:
Uttam Sir!!
Post a Comment