आजही तो जरासा उशिरानेच घरी परतला.
आल्यावर काहीही न बोलता त्याचं ते, चपला नीट जागच्या जागी ठेवणं .
कपडे बदलून शिस्तशीर ठेवण्याची पद्धत , आणि इतरही काही सवई, पाहून मी बरेचदा मनाशीच हसते.
"इतका शिस्तशीर माणूस कसा काय कवी मनाचा असू शकतो ??"
अर्थात त्याच्या कवितांचं जग हे मला कधी कळलंच नाही. मला कायम "माझ्यासाठी नसलेली" अशीच ती बाग वाटत आलीये. पण नवल याचंही वाटतं की याच्या कवितांना वाह म्हणणारे आणि दाद देणारेही कमी नाहीत.
सगळंच एकंदरीत गूढ.
कधी कधी तर अचानक काहीतरी भेटवस्तू आणून मला अचंभित करणारा माणूस आणि कधी " मनाला मन आवडणं म्हणजे आपलेपणा ….बाकी प्रेम वगैरे काही नसतं , असतो तो फक्त व्यवहार !! " अस म्हणणारा अतिशय परखड तो , ही एकच व्यक्ती आहे का ? असाही मला प्रश्न पडतो .
आजही त्यानी फोन केला होता. तुझं जेवण झालं का ? वगैरे विचारलं , आणि नंतर मला उशीर होईल , थांबू नको , काळजी घे म्हणून फोन ठेऊन दिला . त्यानंतर आत्ताच काय तो संवाद. अर्थात त्या संवादामध्ये आपुलकी जाणवावी इतपत आवाजातलं मार्दव. तुटकपणा औषधाला पण नाही.
=========================================================
तिनी बेडरूम मध्ये जाऊन पाहिलं तर उशीवर एक गुलाब ठेवलेलं दिसलं. आणि त्याची पाठमोरी आकृती , शांत झोपलेली.
रेडियोवर गाणं चालू होतं ……
"तरुण आहे रात्र अजुनी , राजसा निजलास का रे ? राजसा निजलास का रे ?? "

आणखी एक अनाथ प्रहर ... आणखी एक पोरका दिवस, आणि उद्याच्या येणाऱ्या दिवसाला
गर्भात घेऊन निजलेली आणखी एक गर्भार रात्र !!........
2 comments:
छान… व. पुंच्या वाटेवर लेखनप्रवास सुरु आहे… All the best :)
Chhaan !! lawakar taak pudhache bhag
Post a Comment