Wednesday, 14 August 2013

कोssहं ??

सतत वळवळ करणारी गांडूळ …… 
आणि त्यामध्ये स्वताला शोधणारा मी ……. 

असतात खूप हात लक्तरं तोडणारे …. 
आणि त्यांपासून स्वताला वाचवणारा मी ……. 

जो तो … जिकडे तिकडे भोगायला आसुसलेला …. 
आणि त्यात शोषला जाणारा मी …… 

हिरवे भगवे केशरी आणि लाल हाताचे दल्ले  …. 
आणि त्यांच्या हाताने विकला गेलेला मी …। 

मुंडकी, धडं, रक्ताचे पाट आणि हृदयाची शकलं …… 
आणि त्या चिखलात माखून सतत "स्पिरीट" दाखवणारा मी ……. 

बंदुकीच्या जोरावर आणि मतांच्या हारावर निवडून येणारे सज्जन …… 
आणि या सगळ्या भाऊ गर्दीत जगायला हरामी ठरलेला मी …… 

स्वातंत्र्य दिनाला तयार होऊन भावनावश होऊन झेंड्याला "एकसाथ  सल्यूट " करणारा …
आणि घरी जातांना रस्त्यावर पडलेला झेंडा पाहून गहीवरणारा ही मीच …… 

हाडामांसाच्या चिखलात रोज आनंदे विहार करणारा मी …। 
आणि घरी जाऊन निस्तेज चेहऱ्याने भारत मातेची लक्तरं पाहणारही मीच …। 

सगळ्या राक्षसांना बारा बापाचे म्हणणारा हि मीच …… 
अन या असुरांना माझा बाप मानून कुल्हे हलवत नाचणारा ही मीच …। 

हो !! हा ही मीच तो ही मीच …. 
हीन ही मीच, दीन ही मीच …. 
या सुफलाम देशात …
पतित ही मीच पावन ही मीच !!

मात्र आता या पुढे …. ठरवायचंय  माझ्यातल्या  या "मी" ने …… 

भगत ही मीच …. 
आझाद ही मीच …. 
नत्थू ही मीच …
राजगुरू ही मीच …. 
शिरीष कुमार ही मीच !!

अन कलकी ही मीच !!
खड्ग ही मीच …. 
खप्पर ही मीच …। 
त्रिशूल ही मीच …
नाग ही मीच !!

सोहम ही मीच …। हंसा ही मीच !!

5 comments:

Aniket A. said...

स्वातंत्र्य दिनाला तयार होऊन भावनावश होऊन झेंड्याला "एकसाथ सल्यूट " करणारा …
आणि घरी जातांना रस्त्यावर पडलेला झेंडा पाहून गहीवरणारा ही मीच …… Todalas Mitra!!!!!


Apratim!!!!!



Unknown said...

हिरवे भगवे केशरी आणि लाल हाताचे दल्ले …. आणि त्यांच्या हाताने विकला गेलेला मी …।
super like...................
मुंडकी, धडं, रक्ताचे पाट आणि हृदयाची शकलं …… आणि त्या चिखलात माखून सतत "स्पिरीट" दाखवणारा मी …….
mangaye
sachhi me man gaye................

Unknown said...

Kd kharch toch mi

adwait said...

किळस, घृणा, उद्वेग, आवेष, त्वेष । मध्यमवर्ग - किंकर्तव्यमूढ !

उत्तम ! मला तुझी सगळ्यात आवडलेली कविता..

Vrushali said...

बंदुकीच्या जोरावर आणि मतांच्या हारावर निवडून येणारे सज्जन ……
आणि या सगळ्या भाऊ गर्दीत जगायला हरामी ठरलेला मी ……

स्वातंत्र्य दिनाला तयार होऊन भावनावश होऊन झेंड्याला "एकसाथ सल्यूट " करणारा …
आणि घरी जातांना रस्त्यावर पडलेला झेंडा पाहून गहीवरणारा ही मीच ……

atishay sundar kavita Kedar... Superlike...