Thursday, 8 March 2007

दवबिंदू !!

आयुष्य ना , एखाद्या दवबिंदू सारखं असलं पाहिजे . छोटसंच , पण असं की , Living  Life to it's Fullest !!

तसं पाहिलं तर दवबिंदू असतो काय ? एक थेंब पाण्याचा ?
का फक्त एक क्षण? काळाच्या कुशीत  गोठून गेलेला? जगणं आणि मरणं दैवाच्या आधीन केलेला ?

खरंच , जगता आलं पाहिजे एखाद्या दवबिंदू सारखं , एकदातरी.
पाणी असून वाहता न आल्याचं दु:ख नाही , किंवा मोत्यासारखं दिसलो याचा गर्व नाही.

तुम्ही कधी ऑबझर्व केलंय का एखाद्या दवबिंदूला ? त्यामध्ये सूर्याला स्वत:त पाहण्याची ताकद असते. पण तरीही तो एखाद्या निर्मल भावने इतकाच हळवा सुद्धा असतो.

त्यामुळे , जेवढं जगलो तेवढं असं जगावं कि जगात किमान एक जण तरी कोणी असं असावं , कि ज्याला आपल्या “असण्याने” आणि “नसण्याने” सुद्धा फरक पडतो.

असं जगता आलं ना ... की मग किती जगलो याला काही महत्व उरत नाही.
“जगलो” हेच खरं देणं , जगाचं .. जगाला परत दिलेलं ....
एखाद्या “दवबिंदू” सारखंच ...... !!


............................ केदार ०३/०८/२००७

7 comments:

हर्षल said...

केदार खुप च्हान लिहिलय. असच लिहित रहा वेगवेगळ. बर वाटत. आपण इतकं च्हान लिहीणाय्राचे मित्र आहोत याचा अभिमान वाटतो.

Parag said...

sahi re...mast lihile ahes! Waiting for more..;)

Kamini Phadnis Kembhavi said...

वा!!
keep it up
असं लिहीत सुटलं की लिहायचं व्यसन मात्र लागतं हं
सो सावधान :-)

Unknown said...

Wonderful .. apratim lihala aahes re :) yup, davbindu .. .one of the beautiful things in the life :)

kedar said...

Wonderful .. apratim lihala aahes re :) yup, davbindu .. .one of the beautiful things in the life :)

Shardul said...

tooooooo good.....awadala ekadam...mana pasun !!!

Unknown said...

अप्रतिम आहे खरच तू एवढ छान कधी पासून लिहितोयेस? असो शुभेछ्या .....