मध्यंतरी पौरोहित्या संबंधी एक पोस्ट वाचनात आली , त्यावेळेस वेळे
अभावी आणि कमी शब्दात कमेंट करणे शक्य नसल्याने हा लेखन-प्रपंच करतोय . वाद-विवाद
, स्पष्टीकरणे , आरोपां-आरोपी या सगळ्यांची मुळीच ईच्छा नाही . मला नाही ,
तुम्हीही फंदात पडू नका . मात्र या दृष्टीने सकारात्मक चर्चा जरूर घडावी. आणि
माझ्या मतात काही चूक असेल तर ती जरूर सांगा.( ती मी मान्य करेन"च" अशी
अपेक्षा मात्र ठेवली नाहीत तरी चालेल)
====================
काही
लोकांच म्हणण होतं की पुरोहित/ब्राम्हणांनी या "पौरोहित्य" प्रकाराचा
बिझनेस केलाय . मला असं वाटतं की त्याला काही हरकत नसावी. कारण कोणी काय करावं हे
सांगायला आपण कोणीही नाही. आणि पैसा हे सर्वस्व नसलं तरी काळाची गरज आहे . आपणं
सगळेही हेच करतो , मग फक्त या एका प्रोफेशन कडूनच "निष्काम-कर्मयोगा"ची
अपेक्षा करणं तितकंस संयुक्तिक नाही.
पण मग जेव्हा तुम्ही बिझनेस करता , तेव्हा २ गोष्टी फार महत्वाच्या आहेत
१)
How
you do it ?
2) How you deliver the deliverables ?
पुरोहित
, भटजी वगैरेंवर माझा राग याच करता आहे.(पुरोहीतांवर आहे , पौरोहीत्यावर नाही)
रागाची काही निवडक कारणे खालील प्रमाणे :
1. पूजा सांगताना तोंडात पान तंबाखू
पुडी इत्यादी ठेवून पूजा सांगणे
2. पूजा ही यथासांग आणि प्रेझेन्टेबल
हवी , अक्ख शिवरुद्र "१.५" मिनटात म्हणतो म्हणून फुशारकी मिरवणारे
"तथाकथित" भटजी पाहिले की डोकं फिरतं . (श्रीरुद्रांस सुद्धा हे बेणं
काय म्हणतंय हे कळतं की नाही हा संशोधनाचाच विषय होईल.
3. एकदा दक्षिणा जर ठरली आहे , तरी
साहित्य दाना वर डोळा ठेवणे . ( हा अनुभव स्वत: घेतलाय . ते महाशय आहेराची पाकीट
मी घेणार म्हणून हुज्जत घालत होते .
4. अव्वाच्या सव्वा पैसे उकळणे - स्वानुभव
:
ग्रह
मंत्राभिषेक (अंगठी घालण्यासाठी ) - ११०१ रुपये
वर्ष-श्राद्ध
- ५०००
सत्यनारायण
- ५५१ ईत्याद .
5. वेळ न पाळणे . (कॉमन दोष)
6. प्रत्येक यजमानाचे वेगळे पैसे
घेऊन सुद्धा "सामुहिक" पूजा
उरकून "टाकणे" !!
7. पूजा चालू असताना पेपर वाचन ,
मोबाईल वर गेम कॉल फोटो ईत्यादी पाहणे .
8. आपण पौरोहित्य करतो त्यामुळे
अवांछित ठिकाणी आपण न दिसलेले बरे , इतके साधे लॉजिक सुद्धा न कळणे . करायचंच आहे
ते घरी करावं , तिथे तुम्ही तुमचे राजे , तिथे कोणी तुम्हाला न पाहू शकतं ना काही
बोलू शकतं.
तूर्तास
इतके पुरे ... यादी मोठी आहे ...
सध्या
अपेक्षित असलेल्या गोष्टी :
1. प्रोफेशन म्हणवता ना पौरोहीत्याला
?? मग प्रोफेशनल राहणं "गरजेचंच" आहे .
2. पैश्याच्या बाबतीत पण प्रोफेशनलीजम
पाहिजे"च"
3. "What you
see , is what you Get !!" - शब्दाला,
आचाराला, प्रेझेन्टेशनला पर्याय नाही!!
नुसतं
मी "ब्राम्हण" आहे म्हणून "मला पहा अन फुलं वाहा !! " हे दिवस
गेले आता ...
लोकांकडे दान धर्म यासाठी पर्याय भरपूर झाले आहेत त्यामुळे हे तथाकथित
"प्रोफेशन" जर टिकवायचे असेल तर "प्रोफेशनल Glamour " ला पर्याय नाही .
मध्ये
मी एकदा "ज्ञान-प्रबोधिनी" च्या पुरोहितांनी सांगितलेली पूजा पहिली ऐकली
अनुभवली , काय ते सुंदर उच्चार , प्रोफेशनलीझ्म , अर्थासहित पूजा समजावून
सांगण्याची पद्धत , उगा
फाफट पसारा नाही. सगळं कसं मुद्देसूद. हे
सगळं पाहिलं की हे पैसे "वाया गेले" असं मुळीच वाटलं नाही !!
मला
माहीत आहे के हे सगळं वाचल्यावर काही "धर्म-मार्तंड" "धर्म-रक्षक" बाह्या सारून
या सगळ्यांची स्पष्टीकरण द्यायला येतील. त्यांना ईतकेच सांगेन , की "Let your
Work and Professionalism Talk about what you do !!". कारण तुम्ही काही पूजा पौरोहित्य करून
"समाजसेवा" करत नाही आहात , काम करताय त्याचे पैसेही वाजवून घेत आहात .
यामुळे "धर्म-रक्षण" "ब्राम्हण(पौरोहित्य करणारे) गरीब असतात ,
त्या बाबतीतच काटकसर सुचते का ?" वगैरे चे डोस इकडे देऊ नका !!
या
शिवाय हे ही इकडे लक्षात घ्यायला हवे की "पौरोहित्य" हे फक्त सिम्बोलिक
प्रोफेशन आहे. कोणत्याही प्रोफेशन ला , मग ती वकिली असो , लेखा परीक्षण असो वा
हॉटेल असो , वरील तत्वे लागू होणारच.
-
केडी . २९ एप्रिल २०१५ .
No comments:
Post a Comment