Friday, 11 November 2011

ती वजाबाकी ... !!

आपण लहानपणी काही गणिती चिन्हे शिकतो ...
कितीवेळा त्याचा अर्थ समजून घेतो ?
सगळी चिन्हे खोटा चेहरा ओढून बसलेली असतात ....

खरं असतं ते फक्त एक चिन्ह ... ते जे सांगतं तेच करतं ... वजाबाकी चं चिन्ह !!

बघा नं .. अधिक ... म्हणजे मिसळणे ... मिळवणे ... "+" ... आपण पाहत नाही ती जागा म्हणजे जिथे दोन रेघा मिळतात ... विरोधाभास ... दोन गोष्टी एकत्र झाल्या ... पण या विसंगती चं काय ?? त्या तशाच राहणार ...
गुणाकार ... "X" इथेही तेच ... वाढणे ... + पेक्ष थोड्या जास्त प्रमाणात .... पण विरोधाभास ?? तो इथेही आहेच ...
भागाकार ? हा थोडा इमानदार ... वजाबाकी च्या जातकुळीतला दिसायला ... भागणे .. वेगळा करणे हे त्याचं काम ... पण याचा मांडलेला खेळ फार क्रूर ... दोन टिंब मध्ये एक रेघ ... कायम दोघांना वाटत राहणार कि आपण कधी तरी परत एकत्र होऊ ... वेड्या आशेचा हा खेळ ... जीवघेणाच ..
राहता राहिला वजाबाकी ... फक्त एक रेघ ... "-" ... अलीकडे काही नाही ... पलीकडे काही नाही ... रेघेचा अर्थ खूप मोठा ... आधी काही नव्हंत आता हि काही नाही ... नं अल्याड नं पल्याड !!

वजा गेल्यावर ... बाकी काहीच राहत नाही .. ठेवत नाही .... ती वजाबाकी ... !! खूप साधी पण अर्थाला जगणारी ... इमानदार !!

4 comments:

Reshma Patil. said...

mastch ...

chintujoshi said...

badhiya sir

Vrushali said...

कदाचित वजाबाकी नवीन काही शिकवेल...

Shabd गौरव said...

saral reshet jagnari maansach khup kahi shikvun jatat, pan navadtya vajabakichya ganitasarkhich... baki kay bolnaar !