Wednesday, 1 December 2010

मुक्काम पोष्ट पुणे-३०... आमची कुठेही शाखा नाही !!

" गाईचं नाही मिळालं तरी चालेल म्हशीचं नाही मिळालं तरी चालेल पण "चितळे" यांच दुध मिळायलाच ("च" बोल्ड इटालिक मध्ये ) हवं "
" या जगात ३ चं गोष्टी स्वयंभू आहेत .. १२ जोतिर्लिंग अष्टविनायक आणि पुणेरी स्वाभिमान " ....

               नाही नाही हे माझं  म्हणणं नाहीये .... ही वाक्य आहेत "मुंबई पुणे मुंबई" या एका छान चित्रपटातील .... खरंच पुण्यात (सॉरी ... पुणे येथे ) ३ वर्षांपासून राहतोय. कधी कधी वाटायचं, कोण जाणे कसचा माज आहे इथल्या लोकांना, माजुर्डे लेकाचे  ? पण कधी कधी वाटायचं का नाही करू माज त्यांनी ?? साहजिक चं आहे ... (खरं तर ३ वर्षात मला पण लागण व्हायला लागलीये या माज करण्याची .... म्हणतात ना .... "पाटलाची घोडी आणि म _ _ ला फुरफुर" तसलंच काहीतरी )

              तर .... मी म्हणत होतो ... पुणे हा खरं तर एक पी.एच्च.डी. चाच विषय आहे . बर्याच थोरामोठ्यांनी या बद्दल लिहून ठेवलंय. आणि पुण्याबद्दल आणि पुणेरी माणसांबद्दल  लिहिण्याचा प्रत्येक "अ-पुणेरी" (अ-मराठी च्या धरती वर ) माणसांस हक्कचं आहे असा माझं मत आहे . मला वाटतं की इकडे राहिल्यावर इथली हवाच अशी जादूई आहे की ती या लोकांबद्दल अणि शहराबद्दल लिहायला उद्द्युक्त करू शकते अगदी कोणालाही... यातून भाई , कणेकर , गाडगीळ , प्रभावळकर कोणीही सुटलेलं नाहीये  (आता मीसुद्धा ;) ) !! आणि खाली लिहिलेली ही माझी पुणेरी लोकांबद्दल काही निरीक्षणं आहेत. पटलं तर घ्या ... नाहीतर  राहिलं. (पाहिलंत ?.. याला म्हणतात माज.जमायला लागलंय आपल्याला पण आजकाल हे )


           प्रत्येक पुणेरी माणूस (बाई सुद्धा ) स्वत: स्वत:ला अगदी प्र.के. , तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी किंवा गेला बाजार निखील वागळे च्या तोडीचा समजत असतोच.

          तसंच नजरेचे अनेक प्रकार हे फक्त पुण्यातच पाहायला मिळतात ... उदा: "तुच्छतावाचक" नजर , "कोण तुम्ही ?"  (वयोमाना प्रमाणे कोण रे तू ?) नजर , "पुण्यातले नाही वाटतं ?" नजर आणि इतर अनेक नजरा. आणि गम्मत म्हणजे या नजरांमध्ये वयस्क झाल्यावर एका य:कश्चित बाकावर बसून मोठ्या तपाने येणारी "पारखी" नजर (ही फक्त आजोबा लोकांस असते.. समाजणार्यास इशारा काफी ) ही तर सर्व नजरांवर कड च. (सं: एखादी डहाणूकर बागे सारखी बाग )

              हां मात्र आजी लोकांची गोष्ट वेगळी ... त्यांना सकाळी सकाळी फुले गोळा करण्यात लई विंटरेष्ट. बर इथेही "वेगळेपणा" हा हवाच. इकडे एक विशिष्ट रंगाची आणि कापडापासून तयार केलेली पिशवी हीच खरी ओळख ... त्यावरून तुम्ही ओळखू शकता की या आज्जी पुणेरी दिसतात. (अशा पिशव्यांना जुसापी म्हणतात  "जुन्या साडीची पिशवी" .. रंग ठराविक उदा: गुलाबी,निळा व पिवळा). हो आणि फुलाचं झाड हे दुसर्या व्यक्तीच्या अंगणातीलच असायला हवे.

             आता तुम्ही म्हणाल की का हा बाबा एकदम ज्येष्ठ नागरिकांवर का घसरला ? तर कारण असं की हे ज्येष्ठ नागरिक चं पुण्याची खरी आणि उत्तम ओळख आहेत. हां आता तरुण पिढी नाही असं मी म्हणत नाही ... पण पुणेरी पुणेरी म्हणतात ना ते खरे लोक म्हणजे आजी आजोबा लोकच . चांगल्या अर्थाने आणि वाईट सुद्धा .. पण यात वाईट भाग फार कमी .. अगदी दुर्लक्ष करावा इतपत.

                   आता आपण पुढे सरकू मध्यम वयाच्या पिढी कडे ... ही पिढी म्हणजे ना .. आपल्या आई वडील यांच्या साधारण वयाची ... म्हणजे ४०-५० वर्षे वयोगट.मी जेव्हा जेव्हा या लोकांकडे बघतो ना ... तेव्हा मला आपलं ( उगाच ही असेल कदाचित ) असं जाणवतं की हे लोक ना काहीतरी Confused वाटतात सतत. म्हणजे बघा ना .. हे लोक धड ना पूर्ण पुणेरी धड ना अ-पुणेरी. त्यामुळे मी या लोकांना एक नाव दिलंय , "पार्ट-टाईम" पुणेरी. हे कधी कधी खूप अस्सल पुणेरी वागतात .. आणि कधी कधी अगदी साधे निरुपद्रवी वाटतात . असो. तर हे झालं य लोकां बद्दल. यांचे बद्दल फार लिहिणे नलगे. (अनुल्लेखाने अपमान याचा सढळ हस्ताने वापर. याचे हे एक उदा: समजावे  )
            असो . तर मी लहानपणी पासून ऐकत आलोय की आजी आजोबांची छटा नातवांमध्ये दिसते ..हाच नियम पूर्णता: पाळून जणू काही पुण्याचा " युथ-फोर्स " अर्थात तरून पिढी एकदम अस्सल पुणेरी वाटते. म्हणजे अगदी चितळे बाकरवडी इतकी , वैशाली-रुपाली च्या गर्दी इतकी , गुडलक च्या मिसळी इतकी , कयानी च्या केक  इतकी , मार्झ ओ रीन च्या पास्ता इतकी  आणि सदाशिवाच्या कुचकटपणा इतकी Genuine वाटते.

           यांच्या कडे आधीच्या पिढी मधले सगळे गुण तर आहेतच पण त्या शिवाय कालमानाप्रमाणे आणखी ही काही गुणांची भर पडलीये .. आता मी स्वत: त्याच पिढी मधला असल्याने या लोकांचा जास्त निरीक्षण करणे व होणे हे स्वाभाविकच होतं .

तर हे  गुण असे ..

१)      सिग्नल पडला आहे हे दिसून सुद्धा भरधाव वेगाने गाडी दामटवणे .. आणि त्याच वेळेस माझ्यासारखे गरीब (वाचा : "अ-पुणेरी") हे लाल दिवा पाहून थांबतात त्यांच्याकडे "कुठून कुठून येतात ? " या   नजरेने पाहणे (नोंद : नजरेचा आणखी एक प्रकार ).
२)     पुणे हे एकंच काय ते "शहर" बाकी म्हणजे काय ? खेडीच असा पक्का समज. (स्वानुभव.) पुणे म्हणजेच हुशारी आणि हुशारी म्हणजेच पुणे , याही एका समजाची भर आहे त्यात .
३)      हाXल्या  पाXल्या  गोष्टींसाठी कट्टे बनवणे हा एक रिकाम्या वेळेतला छंद . आता कट्टा बनवल्या नंतर मेंबर कोण ? तर पुणेरीच , मग एक दोन सुरळीत कट्टा-मीट नंतर ,  हा कसा वाईट ? हा कसा भुक्कड ? तो कसा कंजूष ? कोण बाजीराव आहे आणि त्याची मस्तानी कोण ? कोण श्रेष्ठ ? माझ्या बाजूने कोण आहे ?... सरते शेवटी ना कट्टा राहतो ना मेंबर !! परत आपले तोंड वर करून दुसरा कट्टा करायला तयार. आणि गम्मत म्हणजे त्यात मेंबर परत हेच लोक असतात. आहे की नाही मज्जा ? (दुमत नसावे , माझा दांडगा स्वानुभव आहे )
४)      बरं आता एक निरीक्षण म्हणजे (वादातीत चं आहे बुवा , व्याडेश्वरा म्हाराजा सांभाळून घेई रे ) माहित नाही .. पण पुण्यात उलटच प्रकार दिसतो , तो म्हणजे पोरी अगदी बिनधास्त असतात , आणि स्त्री-सुलभ का काय ते ? ती संस्कृती आपली बापडी मुलंच पाळतात (काही अपवाद सोडल्यास). बाप्यासारखे बापे ..पण वागण्यात हा घोळ का असावा बा ? माहित नाही !! (टीप : मी फक्त वागण्यात म्हणालोय , उगीच ध च मा करून वाचू नये )
५)      आणखी एक मला पडलेलं कोडं म्हणजे , कोणी लायनीत उभा राहून जेवायला कसे बा जाऊ शकतात ? या बाबतीत इकडे दांडगी चिकाटी आहे हे मानायलाच पाहिजे . मी कधी बाप-जन्मी रांगेत ताटकळून जेवणासाठी नाही थांबलोय. आता यातही काहीतरी नशा असेल म्हणूनच हे असं करत असतील हे ही शक्याय. पण आपल्या डोक्या बाहेरचं बुवा .
६ )    आणखी एक अट्टाहास म्हणजे जे "मेड इन पुणे " ते चांगलंच आणि उत्कृष्टच. (कमी जास्त प्रमाणात सगळ्याच लोकांत आहे पण तरुण पिढीत जास्तच ) आता चहा सारखा चहा पण काय ? तर म्हणे अमृत-तुल्य . (मम्है ला जाऊन इराण्याचा च्या पिऊन बघा म्हणावं)
७ )   रिकामा रस्ता असतांना अगदी बागेत फिरायला आल्यागत सावकाशीने गाडी चालवणे ... आणि गर्दी दिसली रे दिसली (किंवा सिग्नल लाल दिसला )की सोडा भरधाव गाडी आणि खोळंबलेल्या गर्दीत हॉर्न वाजव वाजव वाजवणे हा तर अगदी आवडता उपक्रम (जणू काही निसर्गाने खूप आतुरतेने हाक मारलीये ).  कित्येक वेळेस गाडीवरून उतरून एक सणसणीत ओढायच  निव्वळ "अ-पुणेरी" असल्या कारणाने टाळत आलोय मी.

         इतर काही फुटकळ गुण (हो गुण फुटकळ पण असू शकतात .. गुण आहे म्हणून काय झालं ?) म्हणा किंवा निरीक्षणे म्हणा ... ती लिष्ट तर अमर्याद होऊ शकते (अगदी दुर्वांकुर च्या थाळी इतपत , तिच्यायला  १८० रुपडे देऊन त्या थाळीत खाण्यासारखं काय असतं ? मला आजतागायत कळलं नाहीये , आणि तेसुद्धा तास तास भर उन्हात उभा राहून ) याउपर दहीवडा , पनीरची भाजी या गोष्टी "मराठी" थाळीत का असतात हे दुसरं कोडं .
        नाश्ता म्हणजे बर्याच ठिकाणी फक्त उप्पीट किंवा शिरा किंवा खिचडीच का असते ?
        मिसळी मध्ये इथले लोक चक्क "पोहे" (काय :-० ??) टाकून का खातात ?(पहिल्यांदा मी हे पाहिलं तेवा झीट येऊन पडायचाच बाकी होतो )
        तसं आणखी एक कोडं म्हणजे इकडे १२ महिने खरवस कसा काय मिळू शकतो बुवा ? १२ महिने गाभण गाय-म्हशी कुठे मिळतात या लोकांना ? (मी मार खाणार होतो असा प्रश्न विचारून , एका हलवायला मी हा प्रश्न अगदी निरागस भावाने विचारला होता . स्थळ : नवी पेठ . हलवाई : एक सुप्रसिद्ध . नाव देणे टाळतोय .)
       पुण्यात चहाच्या टपरीला अमृत-तुल्य का म्हणतात ? पुण्यात कारण नसतांनाही ट्राफिक जाम का होतो ? पुण्यात जर म्हातारे लोक खूप राहतात (एक निरीक्षण ) तर मग त्यांची मुलं कुठे गेलीयेत ?    आणि बाहेर (पुण्या किंवा देशा बाहेर ) असतील तर मग बाहेरून पुण्यात येणाऱ्या लोकांबद्दल पुणेरी लोकांना आकस-राग-द्वेष का आहे ?
      कोणत्याही वेळेस आणि कोणत्याही वारी जर सगळ्या हाटेलात वेटिंग असतं ? तर मग पुणेरी लोक घरी जेवतच नाहीत का ? (एक आचरट शंका)
      इकडे एकाच नावाचे दोन एरिया का असतात ? (सहकार नगर , रामबाग कॉलनी , कोथरूड डेपो आणि स्थानक , नवीन माणसाची गोची होते )

               पण बाकी काही असो, हे मान्य करायलाच हवं की पुणे ही एक नशा आहे , एक सवय आहे .... एक गारुड आहे. कितीही नको नको असा वाटलं तरी रोज सकाळी उठून हे सगळं हवंहवसच वाटतं.

               माझे हे काही शेवटचे दिवस आहेत पुण्यातले ... पण हे मात्र नक्की ... की या ३ वर्षात पुण्याने मला खूप काही शिकवलंय ... खूप गोष्टींचा अनुभव दिलाय !! उगीच नाही याला ज्ञानाचं माहेरघर म्हणत .
                माझ्या आठवणीत नेहमी राहील सिंहगड , ताम्हिणी , पाबेघाट , खडक , पानशेत , पेठ, DRDO चा भाग , कॅम्प कोरेगाव पार्कातील विशिष्ट तरीही "पुणेरी"च असलेली संस्कृती.
                कायम राहतील आठवणी केलेल्या खादाडी च्या .. म्हणजे अगदी टिळक पासून जॉर्ज पर्यंत , गुडलक पासून कयानी पर्यंत , रु-वै पासून वाडेश्वर पर्यंत.
                 कायम राहतील आठवणी पर्वती च्या आणि राजा केळकर च्या , फरासखाना च्या आणि शनिवार वाड्याच्या , चतुश्रुंगी च्या आणि पुणे विद्यापीठाच्या !!
              लक्षात राहील तो पुणेरी पाउस अणि भन्नाट थंडी .. खुप असुनही हवी हवी वाटणारी ..
                कायम राहतील लक्षात ठेके मिरवणुकीचे आणि लक्षात राहतील ते कृपाळू डोळे खजिना विहीर  , कसबा , दगडूशेट , आणि मानाच्या गणपतींचे !!
              लक्षात राहतील कर्वे रोड , बापट रोड , जे एम , आणि एफ सी !!

परत जेव्हा केव्हा पुण्य-नगरीत परत येण्याचा योग येईल , तेव्हा मला पुणे असंच आहे तसंच पाहायला नक्की आवडेल !!

तर साठाउत्तराची कहाणी पाचा  उत्तरी संपवून श्रींच्या चरणी अर्पण करतो ! 
चू . भू . दे . घे .

सध्या मुक्काम पोष्ट पुणे-३०  ..
केदार उर्फ के.डी . (आमची कुठेही शाखा नाही .... हीहीही )

आयला (हे एक सारखं दर २ वाक्याआड पाहिजेच  ) तर हां ... 
"आयला .. जमलाय की मस्त लेख !!" (स्वत: चं कौतुक स्वत : च....... जाता जाता आणखी एक पुणेरी "गुण " !!)


25 comments:

Lokhandwala said...

are baap re... khoopach mast re... !!! sahi sahi ani Sukhshm nirikhshan... Lage raho...KDjeee

Anonymous said...

3 varshaan madhye Barach abhyas kelela ahe..
- Himanshu

Anonymous said...

Mast lihitos..punyacha bharpur experience aalela disatoy tula! ;)_--JAYDEEP

Monica Oak said...

khup mast.. mazapan asach kahisa anubhav ahe.. puna kadhikadhi nako pan tarihi havahavasa vatnara ahe..

Anonymous said...

khup sahi lihila ahes.. good obsrvation n critics..!!

bt all n all pune rock..!! tht u said 2ru..!!


Gayatri Dixit

Anonymous said...

Utkrushta,,,,,, bhanaat lihila aahe...
----- Sameer Nagapurkar

Pooja said...

Lai Bhari lhilays ki re gadya!!!!! mastch pune mala vdat nhi pan tuze anubhav vachun majja ali....... kadhi tari punyat rahaychi wel aali tar enjoy karen me ase vate (attach vachlay tyamule thoda wel effect rahane sahajikch aahe mhana ;))...... hehehehhee......... khup chhan.... keep it up....... mast ,mast.....

Pooja said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...

Khupach mast ani pratyek gost 100% patli..
The way of writting is very effective.. :) proud to be part if Pune :)))
Sandeep kulkarni

Supriya said...

baaaaapre KD kasla bhaari lihilay..
faadlas punyala.. :P
paper madhe..ohh sorry- "wartamaan patraat" ha lekh de...hit aahe ekdum..

chintujoshi said...

mast jamalay..

adwait said...
This comment has been removed by the author.
adwait said...

वा !! छान जमलंय, सांगायची गोष्ट म्हणजे ’माज हा करायचा नसतो तर तो असावा लागतो’:-) आणि एक .. सर्व हिंदी भाषिकांनी मराठी शब्दांची वाट लावायची जबाबदारी घेतली आहे तेवढी पुरे आहे. बिंधास काय अरे ?? बिनधास्त असा स्वच्छ मराठी शब्द आहे ना असो ..
मला जुसापि हे निरीक्षण जाम आवडलं

Kedar said...

अदया ... (अद्वैत असा स्वच्छ शब्द असून सुद्धा हेच बरं वाटतंय .. हेहे ) तर .... बिंदास .. ला बिनधास्त केले ... बाकी तू पुण्यात किती दिवस होतास रे ?? कमेन्ट एकदम "बोलकी" आहे :P

" माज हा करायचा नसतो तर तो असावा लागतो " .................. तोडलंयस फोड़लयंस जिंकलायस .... जबराट ... आवडलं आपल्याला !!

adwait said...

अरे ते वाक्य माझं नाहीये .. मी फ़क्त माध्यम आहे. ते कुणा महात्म्यानी लिहीलेलं आहे. जरा थांब, माजावरचा तो पुर्ण उताराच टाकतो ब्लॊगवर.

Unknown said...

Khup bhari kedar...me pan "अ-पुणेरी na so anubhavala ahe he sagala changala hi ani wait hi:)keep it up.

Unknown said...

Chan Ahhe Kedar ..Asech Kahi aurangabad badal kadhi lihnar aahesh...?

Vrushali said...

bap re... kedar.. barich nirikshane kelit mhanayala pahije.. jamalay bara ka lekha .. agadi ek no. zhalaly ( ek. no. ha ajun "puneri" shabd..)

Parag said...

Sahi re...good one :)

suraj-ghemad said...

bhau aaplyala lay aavadla aahe tuja haa lekh.........aaplya peedhiche tu mast nirikshan kele aahe aani tyache varnan pan ekdam gamtine kele aahes. Keep it up dude :)

गिरिजा said...

hhmm, kay bolnaar ata, sundarach lihilay, mala ajun rahaychay punyat, so tu share keleli tujhi observations jeva kharach majhya samor yetil, kiva ghadtil tev hasu alyashivay rahnar nahi he nakki, baki kay, shevaaat saglyat jasst awadla,Pune awadat nahi mhatla tari shevti namood kelelya goshti kharach manat ghar kartaet, agadi kharay, ani "Lekhankaushalya" baddal tar amhi bapade kay bolnar, surekhach nirikshan..........waiting for next 1.... :D

Shilpa said...

ur jus awsome.
sahi lihilayt..

khup maja ali..
khup manapasun hasayla yetay!!!

-Shilpa

Saurabh said...

Mast lihill ahe....'bhannat' lekh....!!

Unknown said...

jabarnak zalay lekh ekdam.....khatardastach...best....mala ta almost mi tithe rahun alyasarkha watla.....vvvvvv gudddddddd.

Shabd गौरव said...

fukat vachayla comment mhanje puneri pati samju naye, rupda mojun bhramandhwani chi kal dabavi